मनोगत
आपली संस्था या वर्षी ५3 व्या वर्षात पदार्पण करीत असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ५3 वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे.

                    सनी दिलीप कदम

आकर्षक निर्णय
सभासदांकरिता खालील आकर्षक निर्णय घेण्यात आले.
१.मुदत कर्ज १५ लाखावरून २० लाख करण्यात आले .(परत फेड १८० महिने)
२.अल्प मुदत कर्ज २० हजारांवरून ५० हजार रुपये मर्यादा आहे.(परत फेड १२ महिने)
३.कर्जावरील व्याजदर १२% वरुन ११% करणेचा महत्वपूर्ण निर्णय
४.मध्यम मुदत कर्जाची ३० % रक्कम परत फेडीची अट शिथिल करून वाढीव कर्ज मंजुरीस पात्र , मध्यम मुदत कर्जाचे १२ हफ्ते व अल्प मुदत कर्जाचे ३ हफ्ते परत फेड झाल्यानंतर त्वरित कर्ज मंजुरी.


मुदत ठेवीवरील व्याजदर
ठेवीचा प्रकार व्याजदर
मुदत ठेव १ ते ९० दिवस ६ %
मुदत ठेव ९१ ते १८० दिवस ६.५ %
मुदत ठेव १८१ ते १ वर्षे ७.५ %
मुदत ठेव १ ते २ वर्षे ८.५ %
मुदत ठेव २५ महिने व त्यापुढे ९ %
ठेवीचा प्रकार व्याजदर
बचत ठेव ६ %
रिकरिंग १३ महिन्याकरिता ७ %
रिकरिंग २५ महिन्याकरिता ८ %
३७ महिने व त्यापुढे ९ %
कन्यादान व आवर्तक ठेव ६० महिने करिता १०%
कन्यादान व आवर्तक ठेव १२० महिने करिता १०.५० %

कर्जावरील व्याजदर
कर्जाचे प्रकार व्याजदर कर्ज मर्यादा मुदत
अल्पमुदत कर्ज ११ % ५०,०००/- १२ महिने
मध्यम मुदत कर्ज ११ % २०,००,०००/- १८० महिने

कर्ज मंजुरी हफ्ते तक्ता (फक्त मुदत कर्ज हफ्ता)


कर्जदारास जामीन होणार्‍या सभासदांसाठी सुचना
१. ज्या कर्जदारास जामीन होणार आहात अशा कर्जदाराबाबतची संपुर्ण माहिती आपण संस्थेकडून उपलब्ध करुन घ्यावी.
२. कर्जदार नियमितपणे कामावर येत आहे किंवा नाही याची खात्री करुन घेणे.
३. संस्थेच्या थकबाकीदार सभासदास कर्जासाठी जामीन होता येणार नाही.
४. कर्जदाराच्या खात्याची माहिती संस्थेच्या अधिकृत कर्मचार्‍याकडून घेवुन जामीनदार होणे या बाबतचा निर्णय घ्यावा .
५. एका व्यक्तीस फक्त दोन कर्जदारांस जामीन राहता येईल.
६. कसल्याही अमिषापोटी व दबावापोटी जामीन होऊ नये.
७. कर्ज रक्कम मोठी असल्याने त्याची परत फेड करणे जामिनदारासाठी जिकरीचे होऊ शकते. योग्य कर्जदारास जामिनकी म्हणजे कर्ज परत फेडीची हमी व पतसंस्थेच्या प्रगतीस हातभार.