मनोगत
आपल्या संस्थेच्या स्थापनेला या वर्षी ४८ वर्ष पूर्ण झाली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ४८ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे.

                    सुकाळे सीमा अनिल
सुस्वागतम्
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की सन 2019-2020 सालची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 18.8.2020 रोजी सकाळी 11.00 वाजता संस्थेच्या शुभम गेलेरिया पिंपरी स्टेशन पुणे 18 येथे online पद्धतीने आयोजित केली आहे. तरी आपण प्रत्यक्ष सभेस उपस्थित न रहाता zoom app व्दारे या लिंकवर online उपस्थित रहावे.आपणास login id password whatsapp/sms व्दारे देण्यात येईल. तसेच लाभांश बाबतचा मेसेज मोबाईल वर देणेत येईल. याकरिता संस्थेच्या कार्यालयात गर्दी करु नये. लाभांश रक्कमा दि. 19.8.2020 ते 21.8.2020 पर्यन्त सर्व सभासदांच्या बँक खात्यावर जमा केल्या जातील. तसेच मयत सभासदांना मृत्यु सहाय्य निधी रुपये 5000/- वरून रुपये 10000/- व सेवानिवृत्त सभासदांचा गौरव निधी रुपये 2500 वरून रुपये 5000/- करणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. तसेच सलग 25 वर्षे सभासद असणाऱ्या सभासदांचा यापूर्वी एक मनगटी घड्याळ देऊन सन्मानित करणेत येत होते. तथापि कोरोना परीस्थिती मुळे या सभासदांना रू.5000 त्यांचे बँक खाती जमा करणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. गुणवंत विद्यार्थी इयत्ता 10 वी व 12वी मध्ये 80% पेक्षा जादा मार्क मिळालेले असेल त्यांचे मार्क शीट ची 1 झेरॉक्स प्रत कार्यालयात सादर करावी त्यांना प्रत्येकी रू.500 ची मदत संस्थेमार्फत करणेत येईल. आपल्या काही सुचना असलेस त्या दि. 14.8.2020 पर्यन्त संस्थेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे. त्यानंतर आलेल्या सुचनांचा विचार सभेत केला जाणार नाही.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका
  • सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.
  • शुभम गॅलेरीया,गाळा क्र.१०१,पहिला मजला,क्रोमा शोरूमचे वर,पिंपरी स्टेशन,पुणे-१८ .
  • फोन नं. ०२०- २७४६००४४/४५